नागरिकांसाठी महत्त्वाचे सुचना -
अ.क्र. सूचना
१. अर्ज कसे करावे हे पाहण्यासाठी येथे क्लीक करा. क्लिप पहा .
२. जन्म- मृत्यू दाखला हे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषे मध्ये हवे असल्यास आई व वडील यांचे प्रत्येकी किमान २ कागदपत्रे ( मराठी व इंग्रजी मध्ये नाव असलेले ) जोडणे आवश्यक आहे.
३. जन्म व मृत्यू दाखल्याच्या कोणत्याही सेवे साठी एकदाच अर्ज करावा. डुप्लिकेट अर्ज करू नये.
४. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, दाखला तयार झाल्यानंतर महापालिकेकडून SMS व ई-मेल द्वारे कळविले जाईल. तद्-नंतरच ऑनलाईन पेमेंट करून दाखला डाउनलोड करता येईल.
५. कोणत्याही सेवेसाठी ऑनलाईन अर्ज निशुल्क करता येईल.
६. जन्म व मृत्यू नोंदणी दुरुस्ती मध्ये अर्ज करते वेळी जर नावात बदल हवे असेल तर जन्म दुरुस्ती मध्ये अर्ज करावा , स्पेलिंग दुरुस्ती मध्ये करू नये.
७. बाळाचे नाव एकदा नोंदविल्यावर बदलता येणार नाही त्यामुळे नाव बदल दुरुस्ती साठी अर्ज करू नये.